झोपडी जरा राहू दे... ✍
नटलेल्या वेलीसगंत
सजलेल्या धरतीवर आस
आता टिकू दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
प्रसंग न्यारा खळखळणारा
झरा थोडा अजून खळवळू दे..
निसर्गातील वेलीचा आसरा
डोंगराच्या आडोसाला
जास्त उमलू दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
गावाकुसावरून एक फटका
आदिवासी डोंगर कडेने
कवेत घेऊ दे..
आदिवासी डोंगर पायथ्याला
थोडा वळसा घालू दे..
पायथ्याशी चालीरीती जपू दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
आदिवासी डोंगरावर डोंगरदेव
परंपरा चालीरीतीने टिकवू दे..
आदिवासी खेड्याला वाळवंट
होण्यापूर्वी जपू दे...
थोडा श्वास नव्याने डोंगरला
घेऊ दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
आदिवासी डोंगर पूर्वी
सारखा नव्याने बहरू दे
वातावरणातील पाऊस
जोराने बरसू दे...
आदिवासी माझा गावकुसाबाहेर
चालीरीतीने परंपरेने राहू दे...
शतकातील इतीहास सांगण्यासाठी डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
माधव ह.गावित ✍✍ 9657557198
नटलेल्या वेलीसगंत
सजलेल्या धरतीवर आस
आता टिकू दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
प्रसंग न्यारा खळखळणारा
झरा थोडा अजून खळवळू दे..
निसर्गातील वेलीचा आसरा
डोंगराच्या आडोसाला
जास्त उमलू दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
गावाकुसावरून एक फटका
आदिवासी डोंगर कडेने
कवेत घेऊ दे..
आदिवासी डोंगर पायथ्याला
थोडा वळसा घालू दे..
पायथ्याशी चालीरीती जपू दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
आदिवासी डोंगरावर डोंगरदेव
परंपरा चालीरीतीने टिकवू दे..
आदिवासी खेड्याला वाळवंट
होण्यापूर्वी जपू दे...
थोडा श्वास नव्याने डोंगरला
घेऊ दे..
डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
आदिवासी डोंगर पूर्वी
सारखा नव्याने बहरू दे
वातावरणातील पाऊस
जोराने बरसू दे...
आदिवासी माझा गावकुसाबाहेर
चालीरीतीने परंपरेने राहू दे...
शतकातील इतीहास सांगण्यासाठी डोंगराच्या आडोसाला एक
झोपडी जरा राहू दे...
माधव ह.गावित ✍✍ 9657557198