Sunday, December 2, 2018

उडावा खळ्यातील

📚📚उडवा खळ्यातील

वर्ष भर जीवनराण करुण
जमा करतोय बाप माझा सोन्याहून भारी उडवा
कनीष खळ्यातील...

चिपळी चिपळी जमा
करतोय बाप माझा
हो धान्य उभ्या
उन्हातील...

भर पावसामधील दऱ्यामध्ये
होते वनवन पायातील ...
तेव्हा कुठे तरी होतेय उडवा कनीष खळ्यातील...

उडवा माहित नसेल
नवतरूण पिढीला
पण बाप माझा सोने
पिकवतो घामातील
सौदर्य आदिवासी
वनातील...

कोण म्हणतेय रिसर्च
करत नाही आम्ही
जंगलराणाचे
कोण म्हणतेय रिसर्च
करत नाही आम्ही
जंगलराणाचे...

येऊन तर बघा
आमच्या खळ्यात,
गिनीज बूकात नोंद होईल
अशी उडवा कनीष
किमया आहे आम्हची
निसर्ग खळ्यातील...

माझा बाप राब राब राबतो
तेव्हा कुठे फूलते माती
आणि त्या निसर्ग
उडवा खळ्यातील
शेती राणातील...

ट्रॅक्टर नाही म्हणून
रडत नाही  बाप माझा ...
बैलच आपले सोबती
आणि सर्वस्वी निसर्ग दैवत माणतो आणि खातो
ईमानदारिची भाकरी खळ्यातील...

   
 ✍📚माधव ह गावित📚