*चला शाळेत जाऊ या...*
चला शाळेत जाऊया
मित्रांच्या खोड्या काढूया...
खेळता खेळता मस्ती
करू या...
चला शाळेत जाऊ या
अभ्यास करता करता
लपंडाव खेळूया...
खेळात भाग घेऊ या
स्पर्धेत सहभाग नोंदवूया...
चला शाळेत जाऊया
नेतृत्व आपलं सिद्ध करूया...
देशाच्या भवितव्यासाठी
सर्वस्व पणाला लावूया...
चला शाळेत जाऊया,
झाडे लावूया, गाणे गाऊया ...
परिसर आपला स्वच्छ
करूया, सहल प्रवास
करूया...
चला शाळेत जाऊया
अभ्यास करूया
गप्पागोष्टी करूया...
निसर्गाचा समतोल
साधत वाट काढूया...
चला शाळेत जाऊया पाण्या
पावसाची काळजी घेऊया...
ढगफुटीकडे लक्ष देऊया...
*डॉ. एम. एच. गावित*
No comments:
Post a Comment